You are currently viewing आपली सुंदर स्वाक्षरी आपले व्यक्तिमत्व दर्शविते—- सुरेश ठाकूर

आपली सुंदर स्वाक्षरी आपले व्यक्तिमत्व दर्शविते—- सुरेश ठाकूर

मालवण :

“आपली सुंदर आणि आपल्याच मातृभाषेत साकारलेली स्वाक्षरी आपले व्यक्तिमत्व दर्शविते , अभिजात मराठी भाषेचा अभिमान सांगत असताना प्रत्येकाने आपली स्वाक्षरी मराठीतूनच केली पाहिजे” असे उदगार सुरेश शामराव ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद मालवण आयोजित माझी आकर्षक मराठी स्वाक्षरी अभिनव स्पर्धेच्या कौतुक सोहळ्या प्रसंगी काढले.

ही स्पर्धा कोकण मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोमसाप कार्यालय आचरा येथे घेण्यात आली. या स्पर्धेत ११४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, त्यात १० सुंदर स्वाक्षऱ्यांची निवड करणेत आल्या त्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे –अशोक कांबळी, डॉ. प्रमोद कोळंबकर, गिरीधर पुजारे, बाळकृष्ण बिडये, त्रिंबक आजगावकर, दिव्या परब, श्रावणी प्रभू, प्रसन्ना ठाकूर, वर्षाराणी अभ्यंकर आणि दीपाली खंडगावकर .

स्पर्धेचे परीक्षण रामचंद्र कुबल आणि सुरेंद्र सकपाळ यांनी केले. वरील सर्व विजेत्यांना व परीक्षकांना दत्तात्रय मुळीक, माजी गटशिक्षणाधिकारी पं. स. मालवण आणि माधव गावकर यांच्या हस्ते हस्ताक्षरमहर्षी विकास गोवेकर यांचे पुस्तक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शेवटी पांडुरंग कोचरेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

प्रतिक्रिया व्यक्त करा