*जागतिक साकव्य, मनस्पर्शी अन् सर्वांच्या मनात बसलेल्या कै.डॉ.सौ. निलांबरी गानू लिखित अप्रतिम गझल*
*गझल*
स्वप्नात तूच येतो, जगणे खिळून आहे
जागी जरी जहाले अंमल अजून आहे
मृत्यू असे कशाने कोणास ठाव आहे ?
आनंदताच मी का मृत्यू दडून आहे
असता मुकेच अश्रूं वाचा हवी
तयांना
डोळ्यात आसवांचा ताफा रुसून आहे
झाला फकीर माझा नेली फिकीर त्याने
सुख दावणीस माझ्या वस्ती करून आहे
पाषाणभेग झाली वृक्षास जीवदात्री
स्मरतोय तो जिव्हाळा म्हणुनी तरून आहे
होडीत कागदाच्या शैशव निघून गेले
थांबून काळ क्षणभर तेथे अजून आहे
कल्लोळ भावनांचा माझ्याच आठवांचा
गेलाय काळ सरुनी दंगा स्मरून आहे
🖊️डॉ.सौ.नीलांबरी गानू
*भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹*
