You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात Mock Drill व फायर ऑडिट प्रशिक्षण संपन्न

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात Mock Drill व फायर ऑडिट प्रशिक्षण संपन्न

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात Mock Drill व फायर ऑडिट प्रशिक्षण संपन्न

सावंतवाडी

उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे आज दि. 10 रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्व अधिकारी, कर्मचारी, परिचारिका व सुरक्षा रक्षक यांच्यासाठी Mock Drill संदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले.

नुकतेच अमरावती येथील शासकीय रुग्णालयात अग्नितांडव होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी यांची बैठक पार पडली होती. यावेळी रुग्णालयातील लोंबकळणाऱ्या वायरिंगसह काही त्रुटी आढळून आल्या होत्या व त्या दुरुस्त करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांनी डॉ. विशाल रेड्डी यांना दिले होते.

काही महिन्यांपूर्वीच रुग्णालयात फायर पाईप लाईनची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. अमरावती दुर्घटनेनंतर पुन्हा फायर ऑडिटचे आदेश आल्याने आज प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

कोणत्याही प्रकारचा अग्नितांडव झाल्यास जीवितहानी होऊ नये यासाठी फायर यंत्रणा कशी हाताळावी, रुग्णांना सुरक्षित बाहेर कसे काढावे याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण फायर ऑडिट पथकाकडून देण्यात आले.

याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा