You are currently viewing भाजपाच्या माध्यमातून वेतोरे गावात विकासगंगा आली

भाजपाच्या माध्यमातून वेतोरे गावात विकासगंगा आली

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली .

वेंगुर्ले

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दोन कोटी रुपयांचा निधी वेतोरे गावाला प्राप्त झाला असून विविध विकासकामे भाजपाच्या माध्यमातून होत असल्याने ही वेतोरे गावासाठी विकासगंगा आहे , असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले .

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे – सबनीसवाडी येथील साकवाचे भूमिपूजन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले .कित्येक वर्षाची मागणी असलेला , तसेच लोखंडी साकव जिर्ण होऊन मोडकळीस आल्याने वाहतुकही बंद झाली होती . त्यामुळे सबनीसवाडी येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता . परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सबनीसवाडी साकव मंजूर करण्याचे अभिवचन ग्रामस्थांना दिले होते व ग्रामस्थांनी सुद्धा भाजपा उमेदवारांना पुर्ण पाठींबा देत संपूर्ण वेतोरे ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात दिली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून सदर साकवाला ५७.६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करुन वचनपुर्ती केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे .

*वेतोरे ग्रामस्थांनी मानले भाजपा सरकारचे आभार*
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जलजिवन मिशन अंतर्गत १.०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल , तसेच राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने १ कोटी रुपयांचा निधी साकव – रस्ते – शाळा दुरुस्ती – देवस्थान सुशोभीकरण इत्यादी विकासकामांसाठी दिल्याबद्दल भाजपा सरकारचे आभार व्यक्त केले.

या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम ग्रामदैवत श्री.देवी सातेरी देवीला जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून , त्यानंतर सबनीसवाडा साकवाचे भूमिपूजन करण्यात आले . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , महीला अध्यक्षा स्मिता दामले , वेतोरे सरपंचा प्राची नाईक , ता.उपाध्यक्ष दीपक नाईक , उपसरपंच संतोषी गावडे, मा.चेअरमन विजय नाईक , पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील , शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर गावडे ,सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , बुथ अध्यक्ष नितीन गावडे व विरोचन धुरी , ग्रामपंचायत सदस्य यशश्री नाईक – प्रकाश गावडे – विक्रम सावंत – साक्षी राऊळ – विनायक गावडे – सिता शिरोडकर – तुषार नाईक – सुजाता वालावलकर , माजी सरपंच राधिका गावडे व नेहा गावडे , माजी ग्रा.पं.सदस्य अरुण राऊळ – कोमल नाईक – सविता जाधव – स्वप्नाली सावंत , मा.उपसरपंच राधाकृष्ण वेतोरेकर , अनिल नाईक , ताता गावडे , अरुण राऊळ , प्रभाकर गावडे , जनार्दन गावडे , राहुल सबनीस , बंड्या गावडे , मनिषा धुरी तसेच असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + three =