You are currently viewing एकतारीसंगे एकरूप झालो

एकतारीसंगे एकरूप झालो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम सहाक्षरी रचना*

 

*एकतारीसंगे एकरूप झालो*

 

एकतारी संगे

एकरूप झालो

विठूनाम चित्ती

भक्तीरंगी न्हालो…

 

ध्यानी मनी तोच

तोच मायबाप

वाजतो मृदंग

तालावर थाप…

 

जपता मनात

पंढरीचा राजा

उभा विटेवरी

भक्तांचिया काजा…

 

शिरी वृंदावन

फुगड्या घालती

अनंताशी जोडी

ह्रदयस्थ नाती….

 

माळ तुळशीची

घालुनिया गळा

सात्विक विचार

दर्शन सोहळा….

 

निमाला प्रपंच

चिंता त्याच ठायी

देखता पंढरी

विठू रूखमाई…

 

चंद्रभागा स्नान

चिंब वाळवंट

भक्तरज लागे

धन्य झाला तट…

 

भक्तीच्या सरीत

भिजुनिया गाऊ

धन्य पंढरी ही

धन्य तोचि राऊ….!!🙏🏻

 

*🙏🏻अरुणा दुद्दलवार*@🙏🏻✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा