You are currently viewing मोडी लिपी इतिहासाचे अस्सल साघन –  गणेशकुमार खोडके

मोडी लिपी इतिहासाचे अस्सल साघन – गणेशकुमार खोडके

*मोडी लिपी इतिहासाचे अस्सल साघन*
गणेशकुमार खोडके

वैभववाडी महाविद्यालयात मोडी लिपी कागदपत्रे प्रदर्शन कार्यक्रम संपन्न.

वैभववाडी

भारतातील प्राचीन लिपींपैकी एक मोडी लिपी आहे. या लिपीला जवळपास आठशे वर्षांचा इतिहास आहे. यादव काळात हेमाडपंत यांनी सुरू केलेली ही लिपी पुढील काळात प्रशासनाची मुख्य लिपी बनली. मध्ययुगीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी मोडी लिपीचा खुप मोठा उपयोग होतो. शिवकाळ, पेशवाकाळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही या लिपीचा वापर होत होता. तत्कालीन इतिहास समजून घेण्यासाठी मोडी लिपीतील कागदपत्रे महत्वाची आहेत.
या मोडी लिपीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सात महसुली विभागात हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. कोकण विभागातील हे प्रदर्शन वैभववाडी सारख्या ग्रामीण भागात आयोजित करून वैभववाडी महाविद्यालयातील इतिहास विभागाने महत्वाची भूमिका बजावली आहे असे कोल्हापूर पुराभिलेख विभागाचे सहाय्यक संचालक श्री.गणेशकुमार खोडके यांनी वैभववाडी येथे केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष खासदार मा. विनोद तावडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त “मोडी लिपी कागदपत्रांचे भव्य प्रदर्शन” सोमवार दिनांक २० व मंगळवार दिनांक २१ जुलै रोजी करण्यात आले होते.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जन काका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या उद्घाटन
प्रसंगी श्री. खोडके बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर स्थानिक समिती सचिव श्री.प्रमोद रावराणे, विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, श्री.गणेशकुमार खोडके, श्री. विक्रम ठमके, डॉ. प्रसाद देवधर, श्री.सुधीर नकाशे, स्वप्निल खानविलकर, श्री.विवेक आजयने, श्री. प्रदीप लांडे, मकरंद नाईक,
प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण, प्रा.एस.एन. पाटील उपस्थित होते. फीत कापून प्रदर्शन हॅालचे उद्घाटन करण्यात आले. दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिमा पूजन करून मोडी लिपी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
वैभववाडी सारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भागात अनेक मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत. मोडी लिपी वाचकांच्या अभावामुळे जुना इतिहास समजण्यास अडचणी येत आहेत. संबंधित विभागाकडून यावर काहीतरी पर्याय शोधून काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्थानिक समिती सचिव श्री. प्रमोद रावराणे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या माध्यमातून मोडी लिपी प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने हाती घेतलेले हे कार्य अत्यंत उपयुक्त आहे. सा प्रदर्शनाचा लाभ वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला पाहिजे असे आवाहन प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांनी केले व आयोजकांचे आभार व्यक्त केले.
या मोडी लिपी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला विद्यार्थी, प्राध्यापक, शिशिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, पंचक्रोशीतील नागरिक, इतिहास प्रेमी उपस्थित होते.
या दोन दिवशीय प्रदर्शनाला शासकीय व निमशासकीय आस्थापना अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस एन.पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. एम.ए. चौगुले यांनी आभार व्यक्त केले.
सुत्रसंचलन प्रा.संजीवनी पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा