इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ तर्फे आणि रश्मी नाईक यांच्या पुढाकारातून उपक्रम
कुडाळ : इनरव्हिल क्लब ऑफ (कुडाळ) व चेंदवणच्या माजी उपसरपंच व इनरव्हिल सदस्या रश्मी नाईक यांच्या पुढाकारातून चेंदवण येथील २५ महिला शेतक-यांना बहुउद्देशीय शेतकरी किटचे वाटप वाटप करण्यात आले.तेथील श्री पाताळेश्वर मंदिर येथे किट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी इनरव्हिल अध्यक्षा प्राप्ती तेली, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू, सचिव प्राची तेर्से, रश्मी नाईक, प्रिती तायशेटये, स्वप्नाली साळगावकर, ऋतुजा परब, आरोहि माने, सई तेली, पल्लवी बोभाटे, वैशाली कुडाळकर, मेघा भोगटे, ममता पोरे आदी उपस्थित होत्या.
गेल्यावर्षी इनरव्हिल क्लब ऑफ (कुडाळ) च्यावतीने चेंदवण येथे ६०० फळझाडे रोप वितरित केलेल्यामधील २५ महिला शेतक-यांना यावर्षी बहुउद्देशीय शेतकरी किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये फळभाज्या बियाणे, ॲटी फंगल क्रिम, गांडूळ खत, खुरपी आदि साहित्याचा समावेश आहे. यासाठी इनरव्हिल सदस्या अनघा केसरकर, रश्मी नाईक व आरोहि माने यांनी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमाचे प्रास्ताविक डाॅ सायली प्रभू यांनी केले, तर चेंदवण पंचक्रोशीतील महिला शेतक-यांसाठी नेहमीच प्रयत्नशील असणा-या इनरव्हिल सदस्या व माजी उपसरपंच रश्मी नाईक यांनी महिला शेतक-यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
