You are currently viewing उबाठा च्या रहाटेश्वर सरपंचा कल्पना कदम यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

उबाठा च्या रहाटेश्वर सरपंचा कल्पना कदम यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

उबाठा च्या रहाटेश्वर सरपंचा कल्पना कदम यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

*उबाठा ला देवगड मध्ये धक्का

देवगड

उबाठा च्या राहटेश्वर सरपंच कल्पना बलवंत कदम व ग्रामस्थ विनय कदम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला. राटेश्वरच्या सरपंच कल्पना कदम या उबाठा च्या सरपंचा होत्या. यामुळे ग्राम पंचायतीतील उबाठा ची उरलीसुरली सत्ताही कल्पना कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे संपली आहे.
या प्रवेशावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे,अमित कदम, सुरेंद्र कदम, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार नितेश राणे हेच ग्रामीण भागाचा विकास करू शकतात. हे लक्षात आल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केला असे कल्पना कदम यांनी सांगितले. कल्पना कदम यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने विशेषतः उबाठा सेना नेते खासदार विनायक राऊत यांना चांगलाच धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + three =