You are currently viewing अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यात २२ ते २८ जुलैदरम्यान जनसेवा सप्ताह

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यात २२ ते २८ जुलैदरम्यान जनसेवा सप्ताह

आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, वारकरी सेवा व ‘अजितदादा कृषी सन्मान’ पुरस्काराचे आयोजन

वेंगुर्ले :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.

वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत जनसेवा सप्ताहांत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, वेंगुर्ले तालुका महिला अध्यक्षा ऋतुजा शेटकर, शहर अध्यक्षा सुप्रिया परब, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, शहर अध्यक्ष सुरज परब, युवती अध्यक्षा निधी शिरोडकर, प्रविणा खानोलकर, तेजस्वी गावडे, मिनाक्षी आरोंदेकर, सी. तोडकर, सुप्रिया जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महिला बचतगट सक्षमीकरण व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच २३ जुलै रोजी आरोग्य तपासणी शिबिर, २४ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम, २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी सेवा उपक्रम आणि २८ जुलै रोजी प्रगतशील शेतकरी महिला व पुरुष यांचा ‘अजितदादा कृषी सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा