*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ.शरयू शहा लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌷*प्रश्न प्रभो*🌷
मनाचा पीळ सुटणार कधी
स्नेहात तीळ भिजणार कधी
पूर्वपदी मन येणार कधी
बुध्दी प्रगती करणार कधी
ज्ञान गाडगे भरणार कधी
शांती तोरण सजणार कधी
आत्मिक शुध्दी होणार कधी
जीवा मुक्ती मिळणार कधी
नसे माहिती कधी? कधी?
प्रश्न प्रभो सोडवणार कधी ?
डॅा.शरयू शहा.
