आकुर्डी – प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ६० वर्षावरील पुरुषांना व ५८ वर्षावरील महिलांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत आणि बैठक व्यवस्था मिळावी,जी कोविड पूर्वी मिळत होती व २०२० सालापासून बंद झाली आहे , ती पूर्ववत सुरू करावी याकरिता ज्येष्ठ नागरिकांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील, मुख्य तिकीट बुकिंग ऑफिस समोर केले. यावेळी ११० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उपोषणात भाग घेतला.
ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. विजय सिनकर, उपमहापौर सौ.शर्मिला बाबर,नगरसेवक श्री.अमित गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्री बाळा शिंदे, सौ.सरिता साने, उद्योजक श्री.अतुल इनामदार, सलीम शिकलगार, सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश शिंदे,श्री. अरूण थोरात, डॉ श्रीकृष्ण जोशी या सर्वांनी ज्येष्ठांच्या उपोषणाला नैतिक पाठिंबा दिला व आपले मनोगत व्यक्त केले.प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर जोशी तसेच माजी महापौर (पि.चिं.महानगरपालिका) व नागरी समस्या निवारण समिती प्रमुख श्री.आर.एस. कुमार यांच्या अथक परिश्रमाने व कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने हे उपोषण साध्य झाले. आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या श्रीमती जया यादव (मुख्य बुकिंग सुपरवायझर) व श्री. आशिष दत्त (मुख्य वाणिज्य निरीक्षक, शिवाजीनगर परिक्षेत्र )यांना या प्रसंगी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातील मुद्यांचा आम्ही पाठपुरावा करू असे जाहीर आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी, संघाचे माजी अध्यक्ष, तसेच इतर अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.
