You are currently viewing मनसेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडीचे नवनियुक्त वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांची घेतली भेट

मनसेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडीचे नवनियुक्त वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांची घेतली भेट

मनसे कडून पुढील वाटचालीसाठी देण्यात आल्या शुभेच्छा तालुक्यातील विविध विषयांवर करण्यात आली चर्चा

सावंतवाडी येथे आज नवीन नियुक्त झालेले वनक्षेत्रपाल श्री. मदन क्षिरसागर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शुभेच्छा भेट घेतली, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुक्यातील काही महत्त्वाच्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वनक्षेत्रपाल यांच्यासमोर मांडल्या. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील होणारी अवैद्य कामं बंद व्हावीत, तसेच अवैध लाकूडतोड बंद व्हावी, जंगली प्राण्यांचे सर्वतोपरी संरक्षण व्हावे, जंगलातील अवैध शिकार करणाऱ्यांवर नजर ठेवून योग्य ती कारवाई करावी, सावंतवाडी तालुक्यातील निसर्ग आणि नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व्हावे अशी विनंतीहि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकार्‍यांकडे केली. वनाधिकारी श्री. क्षिरसागर यांनी शुभेच्छा स्विकारत तालुक्यातील योग्य पद्धतीने काम होईल, तसेच आपण दिलेल्या माहितीचा वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा केला जाईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष श्री.आशिष सुभेदार, नाना सावंत, देवेंद्र कदम, ऋग्वेद सावंत, मंगेश वरक प्रसाद परब आणि दिनार तेली आदी उपस्थित पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा