You are currently viewing मोकाट जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट; अपघात रोखण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा उपक्रम

मोकाट जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट; अपघात रोखण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा उपक्रम

मोकाट जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट; अपघात रोखण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा उपक्रम

निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून सुरुवात; रात्रीच्या वेळी जनावरे सहज दिसणार, नागरिकांकडून स्वागत

देवगड :

देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात मोकाट जनावरांमुळे वारंवार घडणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी अनोखा पुढाकार घेतला आहे. निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधण्याच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमात भाजपचे कार्यकर्ते राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, दया पाटील आणि वैभव करंगुटकर यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधले.
रिफ्लेक्टिव्ह बेल्टमुळे रात्री वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशात जनावरे लांबूनच स्पष्टपणे दिसणार असल्याने अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे. अलीकडील काळात मोकाट जनावरांमुळे घडलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला असून नागरिकांकडून त्याचे स्वागत होत आहे.
यापुढेही देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील अधिकाधिक मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून रस्ते सुरक्षेसाठी हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा