*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुख जवापाडे…*
सुख म्हणजे असते काय?
शोधायचे आपले आपण
इवलेसे प्रसंग आयुष्यातील
घराला देतात घरपण….
कुटुंबात आनंद असता
केवढं वाटतं समाधान
पैशापेक्षा भव्य वाटतं
आनंदाचं सौख्यनिधान….
ऐकावी सुंदर ती बासरी
संतूर सतारीची सुस्वर तार
ह्रदयातून उमटती आनंदाचे
नादमधुर अवीट झंकार…..
चित्र रेखलेले रंगबावरे
क्षितिजावर उमटलेले
नेत्रसुख किती मिळतं
सागर लहरी उसळलेले…
देव्हा-यात मंद सांध्यदीप
प्रसन्न तेजाने रोज उजळतो
सुख शोधाया नको कुठेही
ज्याचे तो शोधून घेतो….।।
अरुणा दुद्दलवार@✍️
