*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठव*
~~~~~
आठव तुझे ते लाघवी
झर झर झर झर झरते
कुरवाळीत भावनांना
एकांती उरी ओघळते
तो स्पर्श गंध आगळा
शब्दभावनां गीत होते
सारा सोहळा सुखाचा
मौनाचेही मनमित होते
जरी तू अबोली अव्यक्त
वैखरी नित्य गात रहाते
उमलते अंतरी भावप्रीत
सुखद चांदणे रिझविते
आठव तुझेच ते लाघवी
झर झर झर झर झरते
~~~~~~~~~~~~~
*©️वि.ग. सातपुते*
