You are currently viewing महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर वेंगुर्ला वीज ग्राहक संघटनेचा जाहीर निषेध

महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर वेंगुर्ला वीज ग्राहक संघटनेचा जाहीर निषेध

महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर वेंगुर्ला वीज ग्राहक संघटनेचा जाहीर निषेध

शिरोडा येथील तातडीच्या सभेत ग्राहकांचा संताप; तक्रारींच्या निवारणासाठी अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा शुक्रवारी दुपारी ३ वाजता शिरोडा येथील माऊली सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती पूर्वनियोजित असतानाही एकही अधिकारी सभेला उपस्थित न राहिल्याने वीज ग्राहक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरण प्रशासनाचा जाहीर निषेध केला.

या सभेला वीज ग्राहक आपल्या विविध तक्रारी मांडण्यासाठी आणि न्याय मिळावा या अपेक्षेने मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. महावितरणने ग्राहकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने त्यांचे निराकरण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सभेला वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गचे समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर, आरोंदा जिल्हा परिषद सदस्या सुधा कवटणकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य चंदन हाडकी, डीचोलकर, पांडुरंग नाईक, काकतकर, प्रमोद नाईक, आडारकर, आरवलीचे सरपंच समीर कांबळी, तातोबा कुडव, दत्तगुरू परब, किशोर परब, राजू आदुरलेकर, संदीप गावंडे, आबा चिपकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा