You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कृती समितीसोबत प्रशासनाची सकारात्मक बैठक संपन्न

उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कृती समितीसोबत प्रशासनाची सकारात्मक बैठक संपन्न

सावंतवाडी :

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांवर रुग्णालय प्रशासन व उपजिल्हा रुग्णालय कृती समिती सावंतवाडी यांच्यात सकारात्मक चर्चा सोमवार दी ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत उपजिल्हा रुग्णालय,सावंतवाडी येथे संपन्न झाली.

उपाजिल्हा रुग्णालयातील विविध प्रशासकीय आणि आरोग्यसेवेशी संबंधित प्रश्नांबाबत कृती समितीने यापूर्वी पत्राद्वारे निवेदन दिले होते.त्याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत चर्चेचे आयोजन केले व या चर्चे दरम्यान निवेदनातील वेगवेगळ्या विषयांवर प्रशासनाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप सावंत व डॉ.अवधूत यांनी समर्पक उत्तरे देऊन यापुढेही कृती समितीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत रुग्णांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे,रुग्णालयातील त्रुटी दूर करणे आणि प्रलंबित समस्यांवर सामंजस्याने मार्ग काढणे आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला कृती समितीचे नरसु रेडकर,रवींद्र ओगले,राजेंद्र बिर्जे,अँड तेजस परब,पत्रकार संजय पिळणकर आदी प्रतिनिधिंनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.उपस्थितांचे स्वागत डॉ सावंत यांनी केले तर आभार संजय पिळणकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा