You are currently viewing पावसाळी संध्याकाळ

पावसाळी संध्याकाळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पावसाळी संध्याकाळ*

 

संधिप्रकाशाच्या धूसर वाटेवर

पावसाच्या सरी अलगद उतरल्या

आभाळाच्या ओल्या कुशीतून

स्वप्नांच्या धारा बरसू लागल्या

 

मातीतून दरवळला गंध नवा

मनात जुन्या आठवणी जागल्या

थेंबांच्या मंद सुरावटींवर

भावनांच्या वीणा छेडल्या

 

दूर कुठेतरी वीज हसली

मेघांनी गूज काही सांगितले

पानोपानी मोत्यांचे थेंब

निसर्गाने प्रेमाने गुंफले

 

चहाच्या वाफेत विरघळताना

क्षण हे थोडे थांबून गेले

पावसाळी त्या संध्याकाळी

मन पुन्हा एकदा फुलून आले

 

ओल्या वाऱ्याच्या स्पर्शामध्ये

शांत सुखाची चाहूल होती

संध्याकाळ आणि पाऊस मिळुनी

एक सुंदर कविता झाली होती…

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा