कणकवली :
त्रिमुर्ती डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नृत्यशिबिर २०२६’ या समर कॅम्पचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास कणकवलीचे माननीय नगराध्यक्ष संदेश पारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास प्राध्यापक हरिभाऊ भिसे, अच्युतराव वनवे, राजेंद्र तवटे, निलेश वाळके, तसेच सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रतीक लाड, समीर कांबळे आणि प्रशांत पिंपळकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या शिबिरात सुमारे ७० विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कला क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच अशा प्रकारच्या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे मत व्यक्त केले.
हे शिबिर दिनांक २३ एप्रिल २०२६ ते ४ मे २०२६ या कालावधीत नगर वाचनालय कणकवली येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले असून, यात बॉलिवूड, वेस्टर्न, हिप-हॉप, सेमी-क्लासिकल अशा विविध नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक स्टेजचा अनुभव देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
यावेळी सेलिब्रिटी कोरिओग्राफर प्रतीक लाड यांनी अजूनही काही मुलांना या शिबिरात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन त्रि मुर्ती डान्स अकॅडमीने केले असून, पुढील काही दिवस हे शिबिर उत्साहात पार पडणार आहे.
