जीवनावश्यक वस्तूंसह आर्थिक सहाय्याचे वाटप; शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या उपस्थितीत मदत वितरण
आम. दीपक केसरकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी; तातडीने पंचनामा करून शासकीय मदत देण्याचे तहसीलदारांना निर्देश
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ-म्हराटवाडी, बेरडकी येथे झालेल्या वादळात तेथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. बेरडकी येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, अभिजीत मेस्त्री, युवा सामाजिक कार्यकर्ते आनंद (नंदू) गावडे, बबन रेडकर, धनंजय गावडे, निखिल गावडे, यश गावडे, साई नाईक, उत्तम नाईक तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी तहसीलदारांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.
