You are currently viewing चला पंढरीला…

चला पंढरीला…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*चला पंढरीला…*

चला पंढरीला जाऊ चला पंढरीला
विठूरायाच्या भेटीला माथा टेकायला
चला पंढरीला जाऊ चला…

विटेवरी आहे उभा युगे अठ्ठावीस
करकटेवरी त्याचे उभा रात्रंदिस
चंदनाचा टिळा पाहू मुखकमलाला..
चला पंढरीला जाऊ चला…

जनीचा तो आहे सखा दळू लागे तिला
नामदेवा हाती जेवे नाना त्याच्या लीला
कान्होपात्रेचा उद्धार विठाईने केला..
चला पंढरीला जाऊ चला..

हाडे बोलती चोख्याची विठ्ठल विठ्ठल
गोवऱ्यात जनाईच्या विठाईचे बोल
आनंदाच्या डोही बुडे तुकाराम भला..
चला पंढरीला जाऊ चला…

नामसंकिर्तन चाले टाळ बोलतात
पंढरीच्या वाळवंटी सारे डोलतात
पुण्यमयी चंद्रभागा चला डुंबायला..
चला पंढरीला जाऊ चला…

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

_________________________
*संवाद मीडिया*

रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे

रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी मध्ये नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी

रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027

🔸 *कोर्सचे नांव-

💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*

•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*

•Eligibility- 12th Pass Any Stream

• Duration : 3 Years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).

👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).
संधी –

🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.

पत्ता:
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612

📞 संपर्क:

9960906947 / 9422620047

कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

जाहिरात लिंक👇
https://sanwadmedia.com/204123/

───── ──── ──── ──── 

संवाद मीडिया
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क
9421234663

प्रतिक्रिया व्यक्त करा