जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*आपण देवाला घाबरतो का?*
लहान बाळ आजीच्या मांडीवर झोपून आजी बरोबर असते. कधी ती पूजा करत असते. बाळाने काहीही केले तरी तिला चालते.मांडीवर झोपून गडबड करत असते, इकडे तिकडे हाथ लावते, वस्तू ऊचलते पण आजीला सारे चालते. ती बाळाला जराही ओरडत नाही.कारण आजीची देवावर भक्ती, श्रद्धा असते. ती देवाला घाबरत नसते.
बाळ मोठे झाल्यावर आजी त्याला शेजारी बसवून पूजा करते. तेव्हाही बाळ चाळे करतेच पण आजीला चालते.
आता बाळ चालू बोलू लागते. इकडे तिकडे मस्ती करून त्रास देऊ लागते. ऐकत नाही. अशावेळी
ती त्याला बाप्पाची भीती घालायला लागते.
तू ऐकलं नाहीस तर…
जेवला नाहीस तर…. तू खोटं बोललास तर, वाईट बोललास तर इ. वेळी ती बाप्पा तूला पाप देईल. शिक्षा करेल इ. भिती घालते.
नीट काही कळत नाही, बाप्पा म्हणजे राक्षस आहे का?
इ विचार करत बाळाच्या मनात देवाविषयी भिती तयार होते व बाळ देव शिक्षा देईल यासाठी घाबरुन चांगले वागायला लागतो.
स्वत:ची समज येईपर्यंत मुलं मग देव रागवेल ,शिक्षा करेल, यासाठी वाईट गोष्टी सहसा करत नाहीत. वाईट गोष्टींना आजी पाप म्हणते.
पाप करायचं नाही.
मग देवबाप्पाला नेहमी नमस्कार करायचा, परिक्षेला जाताना तर नक्कीच करायचा म्हणजे पेपर सोप्पा जाईल. एखाद्या स्पर्धेला नमस्कार करायचा म्हणजे तो बक्षिस देईल.
घरातील मोठ्यांना नमस्कार करणे. हे सारे अंगवळणी पडत जाते.
दुसरा अडचणीत असेल तर मदत करणे, अन्नाची नासाडी न करणे, दानधर्म, मंदिरात जाणे, पूजापाठ इ. आपोआपच केले जाते कारण हे चांगले कर्म म्हणजे पूण्य आहे.
म्हणजे आपण “god fearing’
समाज तयार करतो. सर्वच घरात आई, बाबा, आजी इ. मोठी माणसे लहानपणापासुन हे कर … व… ते करू नकोस ..
हे मनावर बिंबवत असतात.
म्हणजेच आपली एक मनोवृत्ती तयार होते. देव हा एकच आधार आपल्या पाठीशी आहे.त्यच्याखेरिज आपले कल्याण कोणी करू शकत नाही.तोच आपल्याला संकटात तारुन नेतो. अडचणीत मदत देतो, आपल्यासाठी फायद्याचं चांगलं असेल ते देतो.
ह्या तयार होणार्या मनोवृत्तीमुळे आपण सदाचारी, सद् वर्तनी बनत जातो. वाईट बोलणे , करणे, बघणे शक्यतो टाळतो.
या ऊलट गरजूंना मदत, अतिथीला, आपुलकीची वागणुक, विकलांगांना सहाय, सणवार,श्रद्धेने पाळतो. तिर्थक्षेत्री जातो, श्रद्धेने देव धर्म परंपरा, रितीरिवाज रूढी व कूळाचार पाळतो.
आपोआपच घराबाहेरही आपण, कायदे पाळतो, कर नियमित भरतो. नागरिकत्वाचे नियम पाळतो. व्यसन, दूराचार, भ्रष्टाचार, मोह, हिंसा अत्याचार यापासुन दूर रहातो.
चांगलेच वागू म्हणजे देव रागावणार नाही.
कारण देव रागावला तर काही भयानक अघटित घडेल, दु:खहोईल.
हानी होईल. प्रतिष्ठेला धक्का लागेल. ही भिती सतत मनात जागृत असते.
घराघरातुन मोठी माणसे देवाला चुकलं माकलं क्षमा कर म्हणत मुलाबाळांवर प्रसन्न रहा आयुष्य व यश दे असं पदर पसरुन मागत अहतात.
सौभाग्यवती स्त्रीया पतीच्या दिर्घायुष्यासाठी ऊपास जप तप करतात.
एकंदरच सतत काय?पण आयुष्यभरच आफण देवाला भिऊन जगत असतो.
देव तर चराचरात भरलेला आहे. मूर्तअसे स्वरूप आपण सहसा मंदिराखेरिज पहात नाही.
पण त्याचे अस्तित्व तो आपल्याला जाणवून देत असतो हे आपण वय व बुद्धी वाढेल तसे पहायला लागतो.
आंब्याला आंबाच लागतो, हत्तीला हत्ती व मुंगीच्या अंड्यातून मूंगीच बाहेर हुबेहुब तशीच बाहेर पडते. माणसांचे चेहेरे, फळे फुले त्यांचे रंग आकार चव गंध वेगवेगळेच असतात. इतके तारे, क्षितिज आकाश, चंद्र सूर्य, ऋतू, पिके वनस्पती सारे कसे एका आदेशानुसार पार पाडले जातात. इथे मग बुद्धी देवाचे अस्तित्व मान्य करते. तो चराचरात भरलेला आहे. मूर्तीरूप नसला तरी जगातील सर्व भले बुरे पाहू शकतो.
तो नसता तर बाळाला लागणारे दूध गाईने दिलेच नसते, पिके पिकली नसती. पृथ्वी आप तेज वायू इ. पंचमहाभूते अशी अविनाशी राहिलीच नसती.
म्हणजे तो आहे हे नक्कीच.
कोणाकडे अघटित, शोक, दु:खदारिद्र्य, रोगराई झाल्यावर लोक समजतात कि, देवाने शिक्षा केली.
म्हणजे तो कोपतो. शिक्षा करतो
तेच यश धनधान्य, किर्ती मिळाल्यावर देव प्रसन्नझाला हे सुद्धा समजतो.
यासाठीच आपण देवाला घाबरून असतो.
अपवाद सोडला तर बहुतांश लोक असेच god fearing’ आहेत.
आणि ते बेफाम, बेपर्वा वागत नाहीत
यामुळेच आजचा आपला समाज बहुतांशा नितिमत्ता, चारित्र्य यांना धरून आहे. अपवाद म्हणुनच गुन्हेगार, गुंड, हिंसक प्रवृत्ती समाजात आढळते. सहसा कोणी हाती शत्र धरत नाही.
खरं तर हेच संस्कार मानले जातात.
अगदी मनापासुन म्हणावेसे वाटते, “होय!. आम्ही god fearing आहोत.”. तोच आमचा सुखी व सुरक्षित जिवनाचा आधार आहे.
अनुराधा जोशी.
अंधेरी मुंब ई 69
9820023605
_________________________
*संवाद मीडिया*
*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*
*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*
*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*
*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*
*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*
*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*
*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*
*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*
*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*
*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*
*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*
*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*
*📞 संपर्क : 74100 06037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/203812/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
