सिंधुदुर्गनगरी :
केंद्र व राज्य शासनाच्या ‘अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन’ अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा युनिक फार्मर आयडी तयार करण्याची मोहीम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. फार्मर आयडी नसल्यास पुढील हंगामापासून शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा, काजू, भात, नारळ उत्पादक शेतकऱी बांधवांनी तसेच ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनीधी , शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांनी शासकीय यंत्रणेसोबत सक्रिय सहभाग घेऊन गावातील 100% शेतक-यांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
*फार्मर आयडी का महत्त्वाचा?*
– पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी सह सर्व योजनांचा लाभ एकाच आयडीवर
– पीक विमा, केसीसी कर्ज, फळबाग अनुदान, आंबा-काजू प्रक्रिया योजनांसाठी नोंदणी सुलभ
– ई-पीक पाहणी, 7/12, 8अ ची माहिती डिजिटली जोडली जाणार
– भविष्यात कोणत्याही योजनेसाठी कागदपत्रे पुन्हा देण्याची गरज नाही
– कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी विशेष योजनांचा लाभ थेट मिळणार
– नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचा लाभ पात्र लाभर्थिना थेट मिळणार
*नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:*
1. आधार कार्ड व आधार लिंक मोबाईल नंबर
2. 7/12 व 8अ उतारा
*नोंदणी कोठे करावी:*
1. गावातील सीएससी / महा-ई-सेवा केंद्र
2. https://agristack.gov.in या पोर्टलवर स्वयं-नोंदणी
