प्राधिकरण,निगडी -(दिनांक-२८ जून )
संत तुकाराम हास्ययोग परिवार सेक्टर २७ अ,येथे दरवर्षी दर तीन तीन महिन्यांनी सभासदांचे वाढदिवस तसेच स्नेहभोजन आयोजित केले जाते.
यावेळी दीप प्रज्वलन,गणेश वंदना नंतर सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.यात एप्रिल ते जून पर्यंत ६० ज्येष्ठांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली.संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गुणवंत चिखलीकर (पशुवैद्यकीय अधिकारी)यांनी ९१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यांनी त्याचे मित्रमंडळी व स्नेही तसेच सलीम शिकलगार यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.तसेच या सर्वांनी डॉ. गुणवंत चिखलीकर यांचा सत्कार केला.संघाचे अध्यक्ष श्री.दलिचंद शिंगवी यांनी डॉ. गुणवंत चिखलीकर यांचा सत्कार केला.७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या सौ.मधुरा देवकर,सौ आशा नष्टे,सौ रोहिणी आडकर,श्रीमती मंदाकिनी पवार,सौ वत्सला वाघचौरे,यांचा सत्कार करण्यात आला.
आपली दिनचर्या यावर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यामध्ये सौ.अलका म्हेत्रे, श्रीमती मिनल वैद्य,श्रीमती कुंदा कोळपकर यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.याचे परीक्षण सौ.साधना सपाटे, श्रीमती विमल कुचेकर,व श्री. बाळासाहेब साळुंखे यांनी केले. त्याचे प्रायोजक श्री,दलिचंद शिंगवी,श्री.रामचंद्र डुंबरे व श्री. दिलीप गोसावी होते.
आवर्जून उपस्थित राहिलेले प्रा.ज्ये. नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांनी डॉ. गुणवंत चिखलीकर यांचा सत्कार केला तसेच त्यांच्यातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला.आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी प्रा.ज्ये. नागरिक संघात यावर्षीपासून ८१ तसेच ९१ व्या वर्षात पदार्पण केलेल्या सर्व ज्येष्ठांचे सत्कार करण्यात येतील असे जाहीर केले.वाढदिवस समिती प्रमुख श्रीमती कुंदा कोळपकर व अलका कणखर यांनी सूत्रसंचालन केले.श्री नरेंद्र मिसाळ यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला कार्यकारिणी व वाढदिवस समिती या सर्वांचे सहकार्य लाभले.
