You are currently viewing तळेरे हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

तळेरे हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

वामनराव महाडीक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,तळेरे मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सरस्वती पूजनानंतर बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींनी गुरुवंदनीय अशी कविता सादर करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर , प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर,ज्येष्ठ शिक्षक काटे सी. व्ही., तळेकर डी.सी.,तडवी एन. बी.कानकेकर ए.बी., पाटील पी.एम.,काणेकर पी.एन.,कोकरे ए.पी., टाकळे व्ही.डी.,तांबे ए.बी.,के.पी.तळेकर, प्रकाश घाडी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांचे व उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन कला वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनीं स्वागत केले.


अध्यक्षीय भाषणात बोलताना शरद वायंगणाकर म्हणाले, गुरु आपल्या शिष्यांना जगायला शिकवतो, आपल्या मायेच्या पांघरूणाखाली त्यांना सांभाळून घेतो,अशी गुरुची महानता अनुभवायला मिळाली. गुरू शिष्य परंपरा जपणे ही आपली संस्कृती असल्याचेही ते म्हणाले . पौराणिक कथांमधील गुरूंचे महत्त्व सांगणारे दाखले देत प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक काटे सी.व्ही. म्हणाले ,विद्या विनियन शोभते या उक्तीप्रमाणे गुरुप्रती नम्र झाल्याशिवाय आपल्या ज्ञानाची झोळी भरू शकत नाही.असा नम्रपणा, संयमपणा असेल तर आपण जग जिंकू शकतो . तर गुरु हा अनुभवाचा झरा आहे त्याचे पाणी पिल्यावर आपल्या अनुभवांतही वृद्धी होते असल्याचेप्राध्यापक ए.पी. कोकरे म्हणाले. प्रशालेचे विद्यार्थी स्नेहल तळेकर, विराज नांदलस्कर,तन्वी घाडी, कौस्तुभ तेरवणकर, यांनी विविध कविता,चारोळ्या,गुरुपौर्णिमेचे महत्त्व सादर करत आपली मनोगते व्यक्त केली.प्राध्यापिका एस. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
प्रशालेच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी मिताली चव्हाण हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर स्नेहल तळेकर हिने आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा