You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहर अध्यक्ष पदी सतीश आचरेकर यांची नियुक्ती..

राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहर अध्यक्ष पदी सतीश आचरेकर यांची नियुक्ती..

राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहराध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते सतीश आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी ही निवड जाहीर केली. मालवण येथील हॉटेल चिवला येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अमित सामंत अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकित काका कुडाळकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, नाथ मालोंडकर, आगोस्तीन डीसोजा, प्रमोद कांडरकर, संदेश फाटक, विनोद साळवे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाने शहराध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी सर्व सहकाऱ्यांसोबत घेत यशस्वीरित्या पार पाडणार असल्याचे आचरेकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 8 =