You are currently viewing राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर माध्यमातून कातकरी बांधवांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप..

राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर माध्यमातून कातकरी बांधवांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप..

वेंगुर्ले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री सन्माननीय श्री.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि जिल्हा सोशल मीडिया यांच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील 20 कुटुंबातील कातकरी बांधवांना गृहपयोगी वस्तू व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले
जिल्हा युवती अध्यक्ष सावली पाटकर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला असून गाव तेथे राष्ट्रवादीगावागावात,तांड्या तांड्यात वाडी वाड्यात पोचली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणा ताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहरातील 20 कातकरी जमातीतील कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तू व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी महिला प्रदेश सचिव सौ.नम्रता ताई कुबल माजी जिल्हा बॅंक संचालक नितीन कुबल माजी नगरसेवक श्री.वामनराव कांबळे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन पाटकर शहराध्यक्ष श्री. सत्यवान साटेलकर जिल्हा सरचिटणीस श्री.मकरंद परब महिला शहराध्यक्ष सौ.परब युवती उपाध्यक्ष सिद्धी कांबळे निकिता कांबळे युवती जिल्हा उपाध्यक्ष आरती दळवी युवती जिल्हा सरचिटणीस मेघा कुबल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा