You are currently viewing हिंदू खाटीक समाजासाठी स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी

हिंदू खाटीक समाजासाठी स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी

हिंदू खाटीक समाजासाठी स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी

विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या., (उपकंपनी) मार्फत हिंदू खाटीक समाजातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्वंयरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक व्ही. आर. आरेनवरु यांनी दिली.

            महामंडळामार्फत 50 टक्के  अनुदान योजना- या योजनेस 50 हजार रुपयाची  प्रकल्प मर्यादा आहे. प्रकल्प  मर्यादेच्या  50 टक्के किंवा जास्तीत जास्त 25 हजार पर्यत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

        बीज भांडवल योजना : –  या योजनेस 50 हजार 1 रुपये ते  5 लाख रुपये पर्यंतची प्रकल्प मर्यादा आहे.  प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीजभांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे व्याजदाराने देण्यात येते. या राशीमध्ये महामंडळाचे अनुदान प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार पर्यत समावेश आहे. बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बॅकेच्या कर्जाची परतफेड एकाचवेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाच्या आत करावी लागते. अर्जदारास 5 टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.

        थेट कर्ज योजना :-  या योजनेस  1 लाख रुपये प्रकल्प मर्यादा  आहे. प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार पर्यत अनुदान देण्यात येते व उर्वरित 50 हजार रुपये महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे व्याजदाराने देण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

        एनएसएफडीसी योजना : –  प्रकल्प मर्यादा रुपये 1 लाख 40 हजार पर्यत. एकूण प्रकल्पाच्या 90% एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या मार्फत प्राप्त होणार जास्तीत जास्त रु. 50 हजार च्या कमाल मर्यादेत अनुदान आहे व उर्वरित रक्कम बीजभांडवल स्वरुपात देण्यात येईल. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

            अर्ज करण्यास आवश्यक  पात्रता :- अर्जदार अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक संवर्गातील असावा. व त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. राज्य महामंडळाच्या योजनेकरता वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरीता रु. 3 लाख इतकी आहे. अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा (राज्य/केंद्र) थकबाकीदार नसावा.

अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे

जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला, 3 पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड/मतदान ओळखपत्र, रहिवासी  प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत, पॅनकार्ड, कोटेशन,   व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले. आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल. व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले पत्र, उदा. वाहनाकरीता व इतर  व्यवसायाकरीता लायन्सस, परमिट,बॅच नंबर इ.

बँकेचे खाते क्रमांक व पासबुक ची झेरॉक्स प्रत.

            इच्छुक अर्जदारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा