You are currently viewing बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये देवनागरी सुलेखन प्रशिक्षण वर्ग सुरू; प्रवेश प्रक्रिया सुरू

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये देवनागरी सुलेखन प्रशिक्षण वर्ग सुरू; प्रवेश प्रक्रिया सुरू

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये देवनागरी सुलेखन प्रशिक्षण वर्ग सुरू; प्रवेश प्रक्रिया सुरू

जुलै २०२६ पासून दर शनिवारी वर्ग; ५ वर्षांवरील सर्व वयोगटातील कलाप्रेमींना संधी

सावंतवाडी | प्रतिनिधी :

“सुंदर अक्षर ही केवळ सवय नाही, तर ती एक कला आहे,” या उद्देशाने सावंतवाडी येथील नामांकित बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या वतीने जुलै २०२६ पासून विशेष देवनागरी सुलेखन (Calligraphy) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ अंतर्गत सुरू होणाऱ्या या प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रशिक्षण वर्ग दर शनिवारी दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार असून, ५ वर्षांवरील मुलांपासून सुलेखनाची आवड असलेल्या सर्व वयोगटातील नागरिकांसाठी प्रवेश खुला आहे. या वर्गासाठी प्रतिमहिना ६०० रुपये इतके माफक शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार असून, केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता प्रत्यक्ष सरावावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच सुलेखनातील आधुनिक तंत्र, विविध शैली आणि प्रयोगांची माहिती देण्यासाठी विशेष प्रात्यक्षिके व कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
वर्गासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रशिक्षण स्थळ :
बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स,
सर्व्हे नं. ५४/०१, फॉरेस्ट भवनजवळ, सावंतवाडी.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क :
प्रा. सिद्धेश नेरुरकर – ९४२०२६०९०३.

प्रतिक्रिया व्यक्त करा