उमरगा :
विधवा परित्यक्ता महिलांचे दुःख बाईनच समजून घ्यावे लागेल असे विचार नाईचाकूर तालुका उमरगा या ठिकाणी महिलांना बियानाची मदत कार्यक्रमाच्या प्रसंगी कालिंदी पाटील बोलत होत्या.
नाम फाउंडेशन आणि त्रिरत्न महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जून 2026 रोजी 98 शेतकरी महिलांना प्रति 30 किलो बियानाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक भूमिपुत्र वाघ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महिला विकास केंद्र नाइचाकूर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. एकल महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमाला नाईचाकूर या गावातील एकल महिला, आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला यांची उपस्थिती होती. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून भूमिपुत्र वाघ बोलत असताना ते म्हणाले खऱ्या अर्थानी आई ही घर कर्ती आहे आईच्या नजरेतून सामाजिक बदलाचे अनेक उपक्रम घेण्याची गरज आहे. महिलांच्या वरती होणारी हिंसक कमी करणे, शेतकरी महिलांना पुरस्कृत करणे, विधवाना सन्मान आणि प्रतिष्ठा, न्याय देण्यासाठी काम करणे गरजेचं आहे महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा बिमोड करणे अशा पद्धतीचे कार्य आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. याप्रसंगी प्रत्येक महिलाना बियानाची एक एक बॅग देण्यात आली. सोबत लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंतपाळ, निलंगा आणि उमरगा अशा तीन तालुक्यातील 250 एकल महिला शेतकरी यांना बियाणाची मदत करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन नाईचाकूर येथील रंजना जमालपुरे, यशोदा पवार, मुक्ता हिंदोळे, सत्यवती इंगळे, नंदा नागणे यांनी केले तर या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी, गावातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
