You are currently viewing बाळकृष्ण सखाराम राणे यांच्या ‘सुंदरवाडी: मधाळ स्वप्नांचं गाव’ या पुस्तकाचे प्रकाशन

बाळकृष्ण सखाराम राणे यांच्या ‘सुंदरवाडी: मधाळ स्वप्नांचं गाव’ या पुस्तकाचे प्रकाशन

सावंतवाडी : ‘सुंदरवाडी : मधाळ स्वप्नाचं गाव’ हे बाळकृष्ण राणे यांच्या गाजलेल्या ललित लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे होणार आहे. हे प्रकाशन श्री पंचम खेमराज महाविद्यालय १९८२ सायन्स बॅच यांच्या वतीने आयोजित केलेले आहे.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत खेमसावंत भोसले (राजेसाहेब) व श्रीमंत सौ.शुभदादेवी भोसले (राणीसाहेब), डाॅ. सुधाकर ठाकूर (ज्येष्ठ साहित्यिक), श्री दीपक पटेकर (अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी), प्राचार्य डॉ. भारमलसर हे उपस्थित राहणार आहेत.

सदर पुस्तकात सावंतवाडीतील व्यक्ती, वल्ली, स्थळे, देवालये, नरेंद्र डोंगर, मोती तलाव, चितारआळी, वाडीतील क्रिकेट ,भाजी मार्केट, गोविंद चित्र मंदिर असे अनेक विषय रंजक व माहितीपूर्ण पध्दतीने मांडलेले आहेत.

सावंतवाडीचा इतिहास, संस्कृती, शैक्षणिक व सामाजिक प्रगती यांचा आढावा यात घेतलेला आहे. १९७० ते २०२६ या कालावधीतील सावंतवाडी या पुस्तकात दिसते. प्रत्येक वाडीकराच्या संग्रही असलंच पाहिजे, असं हे पुस्तक आहे.

सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी १९८२ सायन्स बॅच मार्फत करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा