You are currently viewing नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छी विक्रेत्या महिलांना सावलीच्या छत्र्यांचे वाटप

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छी विक्रेत्या महिलांना सावलीच्या छत्र्यांचे वाटप

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छी विक्रेत्या महिलांना सावलीच्या छत्र्यांचे वाटप

देवगड-जामसंडे शहरातील ३० महिलांना उपक्रमाचा लाभ; बुवा तारी यांचा पुढाकार

देवगड : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे शहरातील मच्छी विक्रेत्या महिलांसाठी सावलीच्या मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरातील सुमारे ३० महिलांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
मच्छी विक्री करताना उन्हापासून संरक्षण मिळावे आणि महिलांना अधिक सोयीस्कर वातावरणात व्यवसाय करता यावा, या उद्देशाने या सावलीच्या छत्र्या देण्यात आल्या. स्वच्छता सभापती बुवा उर्फ निवृत्ती तारी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
या छत्री वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष बाळ खडपे, सचिव राजा भुजबळ, योगेश चांदोसकर, नगरसेवक संतोष तारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत मच्छी विक्रेत्या महिलांच्या दैनंदिन कामकाजासाठी अशा सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा