You are currently viewing आपले आरोग्य

आपले आरोग्य

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम लेख*

 

🌷आपले आरोग्य 🌷

      🌷*अ* मधे🌷

 

आरोग्यधन आपल्याजवळ असणे अगदी आवश्यक आहे. आरोग्याविषयी आस्था असावी. आरोग्य उपासनेत अग्रेसर असावे.

अवयव उत्तम असण्यासाठी अंगाला आळेपिळे, अंगमोडीची आसने ..

असा आसनांचा अभ्यास असावा.

 

उषःकाली उठून अरुणोदयापूर्वीच आसने उरकावीत.

आसने आरोग्यमंत्रच आहेत !

आजार अप्रिय असूनही अटळ असतात.

आजारपणाच्या अनेक आपत्ती आपल्यावर आदळूनही आरोग्य अंमलबजावणीत आपण अंमळ *आळशीच असतो*. आणि असह्य आजारानंतर अथवा आयुष्य अखेरीस आरोग्यवर्धनासाठीचा अवलंब अक्षरशः अशक्यच असतो.

आम्हाला आरोग्यमहत्त्व, आसनमहत्त्व उशीरानेच उमगते. आधुनिक उपचार असूनही आसन उपायांचीही आवश्यकता आहेच. आपले अंतर्स्वास्थ, अंतर्मन, अंतर्शुद्धी आणि अंतर्शक्ती.. आपल्या आरोग्यावरच अवलंबून असते.

आत्मवित असणं, अनेकांबद्दल आस्था असणं.. आरोग्यदृष्ट्या आवश्यक आहे.

अध्यात्ममयता आणि उपवास, एकासन.. एकवेळ अन्न आरोग्याला अनुकूल आहे.

 

💥उद्योगप्रिय असावं,

💥आहारात अतिरेकाचा अभाव असावा.

💥आळस अंतरावरच असावा, 💥आयुष्य उभारणी अनासक्तीवर असावी.

💥आपले आयुष्य आनंदाचे असण्यासाठी, अस्वस्थता, असमाधान अंतरावर असण्यासाठी..

💥आरोग्यसाधना आवश्यक आहे.

💥आपल्या आजूबाजूच्या उदाहरणातून अर्थ आकळावा आणि आसनमंत्र आचरणात आणावा.

💥आत्मतेजाची आतषबाजी आपल्या इच्छेवरच अवलंबून आहे.

💥आत्मप्रयोगातून आत्माविष्कार अनुभवावा.

आणि आता अधिकांशाने आत्मोपासनाच अनुभवावी

असा आरोग्यसाधनेचा आदेशच आहे.

💥आता उतारवयात..

आर्थिक, ऐहिक आकांक्षा आवरून आपल्यापुढे आता अप्रतिम आणि अत्यंत उपयोगी उपचार अष्टांगयोग अंमलात आणण्याचे उद्दिष्ट असावे.

 

डॅा.शरयू शहा,मुंबई.

9619023330

॰॰॰॰॰॰॰॰॰॰

प्रतिक्रिया व्यक्त करा