You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल ग्रामपंचायतीत NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल ग्रामपंचायतीत NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर

22 जून रोजी जेष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष कॅम्प; आधारकार्ड व मोबाईलसह उपस्थित राहण्याचे आवाहन

पडेल / प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत पडेल यांच्या वतीने जेष्ठ नागरिक व महिलांसाठी NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कॅम्प सोमवार, दि. 22 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रामपंचायत पडेल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. महिलांना तसेच जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील शासकीय सवलतींचा लाभ सहजपणे मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आधारकार्ड व मोबाईल फोन सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत पडेलच्या वतीने करण्यात आले आहे.

सरपंचांनी सर्व ग्रामस्थांना या उपक्रमाची नोंद घेऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. महिला व जेष्ठ नागरिकांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा