You are currently viewing मागणी घाला

मागणी घाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा.सत्यवान शांताराम घाडी लिखित अप्रतिम लावणी*
वर्ण:-१६
””””””””””

*मागणी घाला*
***************

लपून छपून भेटता, फार उशीर झाला
अवं राया तुम्ही मला लग्नाची मागणी घाला।।धृ।।

ठरवू दोघेही माता-पित्यांच्या आशीर्वादानं
फोडू सुपारी लग्नाची, घालू देवाला गाऱ्हाणं
संपून जाऊदे आपल्या प्रेमाचा बोलबाला
अवं राया तुम्ही मला, लग्नाची मागणी घाला।।धृ।।१।।

असा करीन तुमच्यासाठी मीच शिणगार
वाटल तुम्हास्नी लाखात एक आहे ही नार
आम्हां दोघांचा झ्याक फोटो काढील फोटो वाला
अवं राया तुम्ही मला लग्नाची मागणी घाला।।धृ।।२।।

घोड्यावरून वाजत गाजत जाईल हो वरात
लक्ष्मीच्या पावलांनी येईन तुमच्या घरात
यास्तव सजना तुमच्या मनाचा मेळ घाला
अवं राया तुम्ही मला लग्नाची मागणी घाला।।धृ।।३।।

**********************************
*रचनाकार:-* प्रा. सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺

प्रतिक्रिया व्यक्त करा