*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी दुर्गादास दि. पळसकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”प्रेम छंदा लाउनी “*
**************
प्रेम छंदा लाउनी
का भंगीले सांग कुणी/ धृ/
आज येते उद्या देते
गोड भाषा वेडी आशा
का केली ग
सांग कुणी||
“त्या भिजल्या शारद रात्री
साक्ष होती नेत्रपाती
तव श्वास माझ्या हृदयी भिनला
नव्हते मज जवळी अन्य कुणी”||
प्रेम करणे गुन्हा असुनी
जाण होती तुझ्या मनी
अर्धामुरधा डाव मांडूनी
का मोडीयला सांग कुणी||
कवी दुर्गादास दि. पळसकर पुणे * भ्रमणध्वनी क्र ७३८७९२३८९५*
**********************
.
