You are currently viewing तुकाराम तेव्हाही होते
Oplus_16908288

तुकाराम तेव्हाही होते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तुकाराम तेव्हाही होते*

 

तुकाराम तेंव्हाही होते

आताही आहे

काळ बदलला

पण माणसं बदलली नाहीत

 

सत्याच्या वाटेवर

असत्याचे काटे अंधरलेले असताना

फुलांच्या पायघड्या टाकण्या इतकी

चांगली माणस

तेव्हाही नव्हती आताही नाहीत

किती पिढ्या संपल्यात

पण छळणारी माणसं आजही आहेत

 

चांगलं होवुन रहाण

जरी चांगलं नसेल तरी

युगानुयुगे त्या तुकारामासारख

या तुकारामाप्रमाणे कोणी झालंय का

खोट्या चेहऱ्यावर

खरेपणाचा मुखवटा घातलेली माणस

तेव्हाही होती आताही आहेत

 

आजही न्याय निती आणि

प्रामाणिकतेच्या वाटेवर

खोट्यांच्या बाजारात

असत्यच विकलं जातंय

म्हणून बरबटलेली घाण सावरायला

तुकाराम पुन्हा परत आलाय

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा