You are currently viewing वेंगुर्ला व मालवण तालुक्यातील तब्बल 68 महसूली गावे डोंगरी गाव म्हणून जाहीर

वेंगुर्ला व मालवण तालुक्यातील तब्बल 68 महसूली गावे डोंगरी गाव म्हणून जाहीर

 

 

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण प्रवेशेसाठी पूरक ठरणारा व अतिरिक्त विकास निधीसाठी त्या गावातील विकासाला फायदेशीर ठरणारा डोंगरी भाग असलेला गाव होण्यासाठी वेंगुर्ला आणि मालवण या तालुक्यातील काही गावे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेक वर्ष संघर्ष करत होती. या संघर्षाला महायुती सरकारने प्रतिसाद दिला असून वेंगुर्ला व मालवण तालुक्यातील तब्बल 68 महसूली गावे डोंगरी गाव म्हणून जाहीर झाली आहेत. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, माजी सभापती प्रितेश राऊळ,समर्थ राणे आदी उपस्थित होते.राज्याचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी १३ मार्च रोजी घेतलेल्या निर्णयाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही झाला असून,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हा पूर्ण डोंगरी नसलेला गावही आता डोंगरी मध्ये आला आहे.या वेंगुर्ला तालुक्यातील ४७ गावे डोंगरी मध्ये आली आहेत.तर मालवण तालुक्यातील अजून २१ गावेही या निकषात आली आहेत.यामुळे या सर्व गावांना सर्वांगीण विकासासाठी याचा खूप चांगला फायदा होणार आहे असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

शासनाने अलीकडेच राज्यातील ७७ तालुके डोंगरी पूर्ण गट म्हणून जाहीर केले आहेत.तर कित्येक गावांचा उपगटात समावेश केला आहे.यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.या वेळी श्री सावंत हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती ती आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांनी पूर्ण केली आहे. 13 मार्च रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा सर्वांना होणार आहे. राज्यातील 77 तालुक्यांचा समावेश नव्याने डोंगरी पूर्ण गट म्हणून करण्यात आला आहे. तसेच कित्येक गावांचा ही समावेश पुगतामध्ये करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका सोडून बाकी सर्व तालुक्यांमधील काही गाव डोंगरी या नीकशात येत होते. मात्र वेंगुर्ला पूर्ण तालुका या डोंगरी निकाशा पासून दूर होता. वेंगुरला तालुक्यातील गावे ही या निकषात यावीत यासाठी गेले कित्येक वर्षापासून या परिसरातील लोकप्रतिनिधींचा प्रयत्न होता. मात्र आता ह्या तालुक्यातील तब्बल 47 महसुली गावे डोंगरी उपगट म्हणून निश्चित केली आहेत. त्याचबरोबर मालवण तालुक्यातील 21 गावे नव्याने उपगट म्हणून सामील करण्यात आली आहेत. या निर्णयाचे स्वागत जिल्हावासियांमधून होत असून, भाजप सरकारचे आम्ही अभिनंदन करत आहोत.

 

 

रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्याला पालकमंत्री मिळाल्यापासून बऱ्याच अडकून राहिलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी मार्गी लागल्या आहेत. निधीच्या बाबतीत तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून खूप मोठा निधी जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे.

 

डोंगरी या निकशात गाव आल्याने सर्वच बाबतीत त्याचा फायदा होणार आहे. बांधकाम असो, नवीन शाळा इमारती असो की अन्य विकास असो याचा फायदा होतोच. त्याचबरोबर शैक्षणिक फायदाही मोठ्या प्रमाणात मिळतो. असे सांगतानाच हा विषय मार्गी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत प्रयत्न केले आहेत. त्या सर्वांचा या निर्णयामध्ये मोलाचा वाटा आहे. त्या सर्वांचे आभार श्री प्रभाकर सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.

 

मालवण तालुक्यातील २१ गावे किर्लोस, असरोंडी, शिरवंडे, राठीवडे, असगणी, हिवाळे, ओवळीये, खोटले, हेदूळ, वायंनगवडे, वायरी, पोईप, मसुरे, वडाचापाट, गोळवण, डिकवल, चाफेखोल,कुमामे, नांदोस, तिरवडे, पराड

वेंगुर्ला तालुक्यातील ४७ गावे परुळे, म्हारतळे, कर्ली, पेंडूर, गावतळे, चिपी, केळुस, सखैलेखोल, तळेकरवाडी, मातोंड, होडावडे, पिंपळगाव, गवाण, म्हापण, रावदस, सातवायंगणी, सोन्सुरे, वायंगणी, टाक, वडखोल, खालचीवाडी, न्हयची आड, जोसोली, खवणे, वेंगुर्ला, वरचेमाठ, कनयाळे, मेडा, खानोली, पाल, अणसूर, शेळपी, सातये, वेतोरे, मायना, श्रीरामवाडी, आसोली, कोचरे, कालवी, मोचेमाड, मुठ, तुळस, भोगवे, पडतल, दाभोली, वरचीवाडी, मठ या गावांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा