You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव बोर्डवे येथे स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव बोर्डवे येथे स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव बोर्डवे येथे स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

ओसरगाव :

न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव बोर्डवे येथे आयोजित स्वागत समारंभ प्रसंगी शाळेचे संचालक श्री. येनडे सर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर सर, मर्डे सर, माजी संचालक जगन्नाथ मोडक, शिक्षणप्रेमी शरद साळवी तसेच शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. मोफत वह्यांचे वाटप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा