*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माणूस*
~~~~~
या गजबजलेल्या वर्दळीतही
आज माणूस कुठे सापडेना
प्रेमास्था तर इथे कुठेच नाही
जगण्याचा अर्थ कुणा कळेना
कलीयुग सारे आज भोगवादी
हरवलेल्या साऱ्या प्रीतभावना
क्रूर निर्दयी वासनांचा बाजार
कुस्करतो कोवळ्या कळ्यांना
गरजा फक्त क्षणिक सुखाच्या
स्वार्थापुढे सत्य कोणते कळेना
मनुजा जन्म हा केवळ बुडबुडा
कां ? रे तुला अजूनही कळेना
वेड्या हो रे अंतर्मुख आतातरी
गतजन्माचे भोग इथे जगताना
~~~~~~~~~~~~~~~
*©️विगसातपुते ( भावकवी)*
