मोदीजींचे राष्ट्र समर्पित सेवेचे ४,३९९ दिवस ,
हेच खरे जननायक*
श्रीकृष्ण परब
जिल्हा संयोजक भा.सो.मिडिया
जनतेच्या विश्वासावर उभारलेले नेतृत्व, जनतेतून निवडून आलेले पंतप्रधान भारतीय संविधानाला धरून शपथ घेत आज, श्री नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात प्रदीर्घ काळ सेवा करणारे लोकनियुक्त पंतप्रधान! या तीन निकषांवर ते आता 4399 दिवस पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनले आहे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अभूतपूर्व दिवस. आज पंतप्रधान मोदीजींनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सलग 4399 दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम करत, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या 4388 दिवसाच्या कार्यकाळाला त्यांनी मागे टाकलं आहे. ते भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते ठरले आहेत. ते सुद्धा सलग आणि अखंड, भारतीय लोकशाहीत अशा सातत्यपूर्ण नेतृत्वाचं हे एक दुर्मीळ उदाहरण आहे.
मोदीजींच्या जवळपास २४ वर्षांच्या राज्य व केंद्र सरकारमधील राजकीय प्रवासात त्यांनी अनेक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
* स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले पहिले पंतप्रधान
* सर्वाधिक काळ सत्ता टिकवणारे काँग्रेसबाह्य पंतप्रधान
* हिंदीतर भाषिक राज्यातून निवडून आलेले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते ठरले आहेत
* कांग्रेस व्यतिरिक्त सलग दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे, तिसऱ्यांदा बहुमतासह निवडून आलेले एकमेव नेता.
मोदी हे एकमेव असे नेते आहेत जे सलग 6 निवडणुका जिंकले आहेत – 2002, 2007, 2012 गुजरात विधानसभा आणि 2014, 2019, 2024 लोकसभा. हा प्रवास म्हणजे उत्तम नेतृत्व आणि जनतेचा विश्वासाचं प्रतीक आहे. मोदीजी खऱ्या अर्थाने इतिहासात अढळ स्थान प्राप्त करणारे नेते ठरले आहेत. 15 ऑगस्ट 1947 ते 15 एप्रिल 1952 जवाहरलाल नेहरू जवळपास 5 वर्षे विना निवडणूकच पंतप्रधानपदी राहिले. ‘राज्यपाल नियुक्त पंतप्रधान’ म्हटलं तरी चालेल. हा काळ ते ‘जनतेतून निवडून’ आले नव्हते.ब्रिटिशांनी त्यांना शपथ दिली होती. ती शपथ भारतीय संविधानाला धरून नव्हती. संविधान निर्मिती होण्याआधीच ते पंतप्रधानपदी बसले. मग त्यांच्याच देखरेखी खाली घेतलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते 4398 दिवस सलग पंतप्रधान राहिले. इंदिरा गांधी 4077 दिवस, मनमोहन सिंग 3656 दिवस तर राजीव गांधी 1858 दिवस या निकषांवर पंतप्रधान राहिले. या 5 पंतप्रधानांपैकी नेहरू, इंदिरा, राजीव आणि मनमोहन सिंग यांचा जन्म काँग्रेस पक्षाच्या जन्माप्रमाणेच ब्रिटिश राजवटीत झालाय. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. फक्त नरेंद्र मोदी यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला. त्यामुळे या चौघांपेक्षा ठळकपणे वेगळी, राष्ट्रनिष्ठ कार्यपद्धती आपल्याला मोदींकडे बघून दिसून येते. आज त्यांना निवडून देणा-या जनतेचे खरे अभिनंदन !
