You are currently viewing ढगा प्रसवं प्रसवं

ढगा प्रसवं प्रसवं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ढगा प्रसवं प्रसवं* 

 

वैशाखाचा तडाखा

रान पडलं ओसाड

भुईला हो पडे तडा

शेतं झालं ओसाड-ओसाडं

तहानली माता माझी

भुकेला झाला बाप

असा कसा त्याचा प्रतापं

पन्नाशीला आला तापं

वाट पाहे जीव-सजीवं

झाडं झुडपं झाली निर्जीवं

 

आभाळून येरे आता

ढगा प्रसवं प्रसवं

 

सर-सर, टिप-टिप

बरसती तारा

झुळूझुळू वारा वाहे

सळसळतील जलधारा

दे रे सरी वर सर

पिकू दे शेत-शिवारं

भुक्या जीवा लाभो

दोन घासाची भाकरं

तृप्त होईन माता माझी

डोळा भरूनी आसवं

 

आभाळून येरे आता

ढगा प्रसवं प्रसवं

 

दृष्ट नको तुज वैऱ्याची

आस आम्हां नीत सरीची

दिसं डोळा आकाशी

भास मनी हृदयाशी

रात्र काढली उपाशी

खाऊ काय रे तू पहाशी?

उपाशी रे धरणी माता

पाणी मागतो बळीदेवं

 

आभाळून येरे आता

ढगा प्रसवं प्रसवं

ढगा प्रसवं प्रसवं. ………

 

कवी:- चंद्रशेखर प्रभाकर कासार

धुळे, 7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा