*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पर्यावरण रक्षण…हाच आपला प्रण*
*’ निसर्ग सखा ‘*
निसर्ग आपुला सखा जीवलग
जीवन आपुले करी सुखावह
त्याला स्वच्छ निरंतर राखू या
निसर्गाला जपू या
निसर्गाला जपू या !!
वने आपुला रक्षिती प्राण
पाणी देते जीवनदान
झाडे लावून पाणी अडवून
आपुल्या प्राणा रक्षू या
निसर्गाला जपू या
निसर्गाला जपू या !!
निर्मळ हवा भरभरूनी घेता
पवन आपुला प्राणदाता
त्याच्या भयावह प्रदूषणाने
आपण ग्रस्त रोगराईने
प्रदूषणाला रोखू या
निसर्गाला जपू या
निसर्गाला जपू या !!
जंगले वाढवू झाडे लावून
नद्या वाहू द्या पाणी अडवून
हवा पाण्याचे रोखू प्रदूषण
करी आरोग्याचे संवर्धन
पर्यावरण प्रेमी होऊ या
निसर्गाला जपू या
निसर्गाला जपू या !!
*ज्योत्स्ना तानवडे.पुणे*
