*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सेल्फीचा सोहळा*
हातात मोबाईल आला
की चेहरा हसरा होतो
कधीही कोठेही केव्हाही
एक छानशी सेल्फी घेतो
जिथे जागा दिसेल तिथे
सेल्फी काढायची घाई
कोण काय म्हणेल
याची मात्र जराही भिती नाही
डोंगरावर नदीवर धरणावर
पाहिजे तशी पोझ द्यायची
वाकडं तिकडं तोंड करून
एक छान सेल्फी घ्यायची
एका क्लिकवर कसाही
सेल्फी फोटो निघतोय
इंस्टा फेसबुक कुठेही टाका
सारं जग बघतोय
जेवणाचा फोटो काढून
मग स्टेटसला ठेवायचं
खायचं राहुद्यायच बाजूला
लाईक कमेंट बघायचं
देवळात ही शांतता नसते
सेल्फीवर सेल्फी असते
देव म्हणत असेल तेव्हा दर्शन घे जरा
हा उतावीळपणा नाही बाबा बरा
रडण्याचा फोटो काढून
लयी भारी कॅप्शन देतात
खूप दुःखी आहे आज
खाली हार्ट रडताना दाखवतात
नातीगोती दुर झालीत
मोबाईल प्रेम वाढलं
आरशापेक्षा आता चेहऱ्याला
फ्रंट कॅमेराच जास्त भावलं
कुठे दरी कुठे खोल खाई
पडायला कोण घाबरतो
रोज कुठे ना कुठेतरी
सेल्फीचा सोहळा साजरा होतो
अशा या सेल्फीच्या दुनियेत
जगायचे विसरून गेलेत
म्हणायला चालती बोलती माणसं
पण जीवंत असुनही मेलेत
*संrजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८
