You are currently viewing प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर):

समाजपरिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दूरदर्शी नेते, परिवर्तनकर्ते आणि लोकसेवकांचा सन्मान करणाऱ्या लायन्स क्लब्स इंटरनॅशनल आणि लायन्स कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कारांचा सोहळा १ जून २०२६ रोजी चेन्नई येथील आयटीसी ग्रँड चोला येथे उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. भानुबेन महेंद्र नानावटी होम सायन्स (सक्षम स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना महिलांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रो. डॉ. माला पांडुरंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली डॉ. बीएमएन होम सायन्स (सक्षम स्वायत्त) महाविद्यालयाने महिलांच्या शिक्षण क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम, कौशल्यविकास आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालय सातत्याने कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे महाविद्यालय मुंबईतील महिलांसाठी अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

महिलांना सक्षम, स्वावलंबी आणि समाजाभिमुख नागरिक घडविण्याच्या उद्दिष्टाने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग आणि संस्थेच्या सर्व घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सन्मानाबद्दल विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रो. डॉ. माला पांडुरंग यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा