You are currently viewing कॅमेरून ग्रीनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईची हैदराबादवर मात

कॅमेरून ग्रीनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईची हैदराबादवर मात

*कॅमेरून ग्रीनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईची हैदराबादवर मात*

*रोहितच्या ६हजार धावा तर अर्जुनची पहिली आयपीएल विकेट*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएलच्या १६ व्या मोसमातील २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर १४ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई संघाचे पाच सामन्यांत सहा गुण झाले आहेत. रोहित शर्माचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी हैदराबादचा हा तिसरा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत.

सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला. या पराभवासह सनरायझर्सची विजयी मालिका खंडित झाली आहे. त्यांना विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. पण त्याचवेळी मुंबईने ही किमया साधली आहे.

सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी बोलावले. अर्जुनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या चार धावा दिल्या. त्याच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद करून सनरायझर्सचा डाव गुंडाळला. अर्जुनला आयपीएलमध्ये पहिले यश मिळाले आहे. अर्जुनने २.५ षटकात १८ धावा दिल्या. त्याला मागच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी अर्जुनने दोन षटकांत १७ धावा दिल्या होत्या. दोन्ही सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीने छाप पाडली आहे.

सनरायझर्ससाठी केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. मयंक अग्रवालने ४१ चेंडूत सर्वाधिक ४८ धावा केल्या. हेनरिक क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावा केल्या. एडन मार्करामने २२, मार्को जॅनसेनने १३ आणि वॉशिंग्टन सुंदरने १० धावा केल्या. हॅरी ब्रूक नऊ, राहुल त्रिपाठी सात आणि अभिषेक शर्मा एक धावा काढून बाद झाले. संघाला अखेरच्या षटकांमध्ये अब्दुल समदकडून स्फोटक फलंदाजी अपेक्षित होती, मात्र तो १२ चेंडूत केवळ नऊ धावा करू शकला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अर्जुन तेंडुलकर आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला.

मुंबईकडून ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक धावा केल्या. ग्रीनने ४० चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी केली. त्याला मुंबई इंडियन्सने यावेळी लिलावात १७.५० कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावून ग्रीनने मुंबई फ्रँचायझीचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. त्याने एक विकेटही घेतली. सामनावीर म्हणून ग्रीनची निवड करण्यात आली.

इशान किशनने ३१ चेंडूत ३८ तर तिलक वर्माने १७ चेंडूत ३७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने १८ चेंडूत २८ आणि टीम डेव्हिडने ११ चेंडूत १६ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव सात धावा करून बाद झाला. सनरायझर्सकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांना प्रत्येकी एक बळी मिळाले.

*रोहित शर्माने केली विशेष कामगिरी*

रोहित शर्माने आपल्या छोट्या डावात मोठी कामगिरी केली. त्याने आयपीएलमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या. रोहितने २३२ आयपीएल सामन्यात ६०१४ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा सहा हजारहून अधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला. रोहित शर्मा विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्याने २२८ सामन्यात ६८४४ धावा केल्या आहेत. शिखर धवनने २१० सामन्यात ६४७७ धावा केल्या असून डेव्हिड वॉर्नरने १६७ सामन्यात ६१०९ धावा केल्या आहेत.

 

*संवाद मिडिया*

*👩‍🎓शिक्षण नगरी पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण आता आपल्या सावंतवाडीत* 👨‍🎓

📚 *GURU GLOBAL SCHOOL* 📚
*we care we create*

🥳 *उद्घाटन समारंभ: 2 एप्रिल रविवार 2023* 🥳

🤼‍♀️ *समर धमाका कॅम्प* 🤼‍♀️

*👧फक्त 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 👦*

*♦️Guru Global School ♦️*
*⛹🏻‍♂️WE CARE WE CREAT* 🧗🏻‍♀️
*💢An ISO 0012015 certified 💢*

🧘🏻‍♂️🥊🏇🏻🤾🏻‍♂️🏒🏓🪁🤺🏂🛼🎿

🌤️ *समर कॅम्प* 🌤️

*🏏10 एप्रिल ते 30 एप्रिल 🏏*

*🥍वेळ:सकाळी 10 ते दुपारी 12.30 🥍*

🛼 *Activities ( उपक्रम)* 🛼

*🏋🏻‍♀️थिम बेस ॲक्टीव्हीटी 🪗*
*⛷️लिटल ॲस्ट्रोनट 🪂*
*🤽🏻‍♀️क्ले मोडलिंग 🎿*
*🤾🏻‍♂️इन डोअर गेम 🏂*
*🤺स्टोरी टेलिंग 🪁*
*🥌स्टीम बेस्ड ॲक्टीव्हीटी 🏒*
*🏇🏻आर्ट & क्राप्ट 🛷*
*🧘🏻‍♀️योगा & मेडीटेशन 🧘🏻‍♂️*

🏃‍♀️ *Hurry up* 🏃‍♂️

*✡️मोजक्याच जागा उपलब्ध✡️*

🏇🏻 *आजच संपर्क करा आणि तुमच्या पाल्यांचा सर्वांगिण विकास करा* 🧘🏻‍♂️

*📱9922903515*
*📱9422633433*
*📱9172693343*

*जाहिरात लिंक*👇

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा