You are currently viewing ओरोस येथे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मनसेचा मोर्चा…

ओरोस येथे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मनसेचा मोर्चा…

सिंधुदुर्गनगरी

“अप्पर जिल्हाधिकारी हटाव, पर्यावरण बचाव” अश्या घोषणा देत मनसेने सिडकोभवन ओरोस येथून जिल्हाधिकारी कार्यालयालापर्यंत मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

त्यानंतर मोर्च्याला संबोधित करताना मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत जेवढे जमिन निवाडे झालेले आहेत, त्यांची चौकशी व्हावी. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे. याबाबत लक्ष वेधले आहेत. कासार्डे मायनिंग, तरेखोल, गडनदी, खारेपाटणनदी आदीना आलेला पुर, कळणे येथे बांध फुटून झालेले नुकसान, सुरूंग लाऊन करण्यात येणारे उत्खनन तसेच कळणे मायनिंगबाबत निवेदनातून लक्ष वेधले आहेत. वृक्षतोडीला दिलेली परवानगी, त्यासाठीचा सकारात्मक अहवाल, टायगर कॉरिडॉर असतानाही झालेली कार्यवाही याबाबत कळणे येथील नागरीकाला घेऊन उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही उपरकर यांनी सांगितले.

यावेळी दया मेस्त्री, प्रसाद गावडे, विनोद सांडव, सचिन तावडे, शैलेश अंधारी, दत्ताराम बिडवाडकर चंदन मेस्त्री कुणाल किंनळेकर, बाळा पावसकर, सुनील गवस दत्ताराम गावकर,  आशिष सुभेदार, बाबल गावडे, दीपक गावडे, आप्पा मांजरेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − ten =