*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित बालगीत*
*चिऊ काऊचा खेळ*
चिऊ काऊ चा खेळ खेळू
पंख लावून ऊंच ऊंच उडू ||धृ||
चिऊ काऊ चला दोघं होऊ
गुण्या गोविंदाने संगे राहू
चिऊ काऊ बहिण भाऊ
पंख लावून ऊंच ऊंच उडू ||१||
बांधू घरटं आपलं छोटं
सावलीला झाड खूप मोठं
झाडाच्या फांदीवर झोका घेऊ
पंख लावून ऊंच ऊंच उडू ||२||
दोघं छान छान फळं खाऊ
उंच आकाशात भरारी घेऊ
चंद्र चांदण्या आकाशी पाहू
पंख लावून ऊंच ऊंच उडू ||३||
वारा आला घरटं मोडलं
चिऊ काऊचं खेळणं संपलं
चिऊ म्हणे आता कुठे जाऊ
पंख लावून ऊंच ऊंच उडू ||४||
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
