You are currently viewing गुलाबस्तवन…!!
Oplus_16908288

गुलाबस्तवन…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गुलाबस्तवन…!!*

कोवळी झुळूक तुला
हळुवार बिलगून गेली
सुगंधीत..वा-याची बोटं
समर्थ अभिषेकांनी ओथंबली

ह्दयांत रूतलेल्या काट्यांनी
तुला अखंड जपला
माझ्या मातीनं तुझा
सदैव गौरव राखला..

फुलांनी सजवलेल्या वेदीवर
विध्यात्याने आशिर्वाद दिला
सुवर्णासनावर सुवर्णपर्ण लेऊन
सुर्यदेवासोबत आसनस्थ झाला..

आईचा लाडका तू
माझ्या अंगणात उगवलास
सृजनाचा होऊन श्वास
स्मृतींना जागवून गेलास..

स्पर्शाच्या पालवीत आईच्या
गगनमंडपातून धरेवर आलास
सुवर्णघटिकांच्या किणकिण नादात
आशिर्वाद देऊन गेलास ..

बाबा ठाकूर कवीमाळी
ठाकूरी उवाच..गुलाबस्तवन 2685
सन्मान..गुलाब सम्राट 👑

प्रतिक्रिया व्यक्त करा