You are currently viewing युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात अनोखे ‘मेलोडी आंदोलन’

युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात अनोखे ‘मेलोडी आंदोलन’

*युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात अनोखे ‘मेलोडी आंदोलन’

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांच्या निषेधार्थ अनोखे “मेलोडी आंदोलन” करण्यात आले.

पिंपरी येथील मुंबई-पुणे महामार्गावरील हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पेट्रोल पंपावरील ग्राहक, बसमधील प्रवासी, दुचाकीस्वार तसेच रस्त्यावरील नागरिकांना ‘मेलोडी’ चॉकलेट वाटून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त केला.

सतत वाढणारी महागाई, इंधन दरवाढ आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा आर्थिक ताण याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

या आंदोलनावेळी शहर काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, शहर प्रभारी सत्यजित बिरादार, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस ॲड. उमेश खंदारे, महिला काँग्रेस अध्यक्षा सयाली नढे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुळे, पर्यावरण विभागाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते अशोक मोरे यांच्यासह युवक काँग्रेसचे स्वप्निल बनसोडे, विशाल कसबे, मयूर रोकडे, रोहित भाट, करण गील, हिरा जाधव, सिद्धार्थ वानखडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा